तरुणाच्या छातीत घुसलेली गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रूकमध्ये खेळाच्या मैदानावर सोमनाथ तांबे नावाच्या तरुणावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यात तरुण जखमी झाला होता.

दरम्यान सोमनाथ याच्या पुणे येथील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या छातीत घुसलेली गोळी काढण्यात यश आले आहे. सोमनाथची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी रात्री लांडेवाडी येथे मित्रांसोबत व्हाॅलीबॉल खेळत असताना सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय २१, रा. लांडेवाडी, भेंडा) याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता.

गोळी लागून जखमी झालेल्या अवस्थेत त्याला त्याच्या मित्रांनी नेवासा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

प्राथमिक उपचारानंतर त्याला नगर येथे आणि नंतर पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. पुणे येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आल्याची माहिती नातेवाइकांकडून मिळाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24