Indian Traffic Rules : ट्रॅफिक पोलिसांना आपल्या वाहनाची चावी काढून घेण्याचा अधिकार आहे का? जाणून घ्या नियम

Indian Traffic Rules : भारतात वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. त्यामुळे अनेकदा एखादे वाहन चालवताना ट्रॅफिक पोलीस अडवतात. अनेकदा ट्रॅफिक पोलीस आपल्या वाहनांची चावी काढून घेतात.

परंतु, असे करण्याचा त्यांना अधिकार असतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हे लक्षात घ्या की, भारतीय मोटार वाहन कायदा 1932 नुसार एखाद्या व्यक्तीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर सहाय्यक उपनिरीक्षक दर्जाचे वाहतूक पोलिस कर्मचारीच तुम्हाला चलन देऊ शकतात. एएसआय, उपनिरीक्षक आणि निरीक्षकांना तुम्हाला त्याच ठिकाणी दंड करण्याचा अधिकार आहे.

त्यांना मदत करण्यासाठी वाहतूक हवालदारच तेथे असतात. परंतु,तुमच्या गाडीच्या चाव्या काढण्याचा अधिकार त्यांना नाही. ट्रॅफिक पोलिसांना तुमच्या वाहनाचे टायर डिफ्लेट करता येत नाही.

पकडल्यावर लक्षात ठेवा या गोष्टी

  • तुम्हाला दंड करण्यासाठी वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांकडे चलन बुक किंवा ई-चलान मशीन सोबत असावे लागते. जर त्यांच्याकडे यापैकी काहीही उपलब्ध नसेल तर तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकत नाही.
  • त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनी त्यांचे नाव असणारा गणवेश परिधान केलेला असावा. जर त्यांनी गणवेश परिधान केला नसेल तर तुम्ही त्यांना ओळखीचा पुरावा मागू शकता.
  • त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की तुमच्याकडून वाहतूक पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल केवळ 100 रुपये दंड आकारू शकतात. फक्त एएसआय किंवा एसआय 100 रुपयांपेक्षा जास्त दंड घेऊ शकतात.
  • समजा एखाद्या ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने तुमच्या गाडीची चावी काढून घेतली तर तुम्ही त्या घटनेची नोंद करून जवळच्या पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता.
  • तुमच्याकडे कोणतेही वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तुमच्या कारच्या नोंदणी आणि विमा कागदपत्रांच्या प्रती चालतात.
  • जर तुमच्याकडे दंडाची रक्कम नसेल तर तुम्हाला ती नंतर जमा करता येते. तसेच न्यायालय चलन जारी करते जे त्याच्यासमोर भरणे गरजेचे आहे. दरम्यान, वाहतूक पोलिस तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स ताब्यात घेतात.