Winter Car Tips : देशभरात थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. परंतु,थंडीसोबतच इतर अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. प्रत्येक मोसमात आपल्या कारची काळजी घ्यायला हवी. थंडीच्या मोसमात कार लवकर चालू होत नाही.
हिवाळ्यात आपली कार वॉर्म अप करणे खूप गरजेचं असते. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या कारच्या इंजिनचं नुकसान होऊ शकतं. त्यासोबत इतर काही गोष्टीही लक्षात ठेवाव्या लागतात.
या मोसमात, सीएनजी कार चालवणाऱ्यांना सर्वात जास्त त्रास होतो, कारण हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे इंधन टाकीमध्ये भरलेला सीएनजी गॅस टाकीतच गोठतो. अशा परिस्थितीत थंडीच्या वातावरणात गाडी सुरू करताना अनेक अडचणी येतात.
अशा परिस्थितीत तुम्हीही सीएनजी कार वापरत असाल, तर तुम्ही काही महत्त्वाच्या टिप्स पाळल्या पाहिजेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
तुम्ही तुमची सीएनजी टाकी नेहमी भरलेली ठेवावी, किंवा किमान अर्ध्याहून अधिक ठेवा, जेणेकरून थंडीत कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे तुमच्या कारमध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि जास्त मायलेज मिळेल.
टाकी भरलेली ठेवणे महत्त्वाचे का आहे?
हिवाळ्यात कमालीची थंडी आणि हवेतील आर्द्रता यामुळे हळुहळू टाकीत हवा जमा होऊ लागते. यामध्ये, वाहन सुरू होताच, हवेतील पाणी देखील गरम होऊ लागते आणि द्रव सीएनजीमध्ये मिसळू लागते, ज्यामुळे कारच्या इंधन पंपला समस्या येऊ शकतात. यामुळे इंजिन देखील खराब होऊ शकते आणि तुम्हाला कारमधून कमी मायलेज मिळू लागेल.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ते आवश्यक आहे
थंडीच्या वातावरणात कारमध्ये सीएनजीची टाकी भरलेली ठेवणे शहाणपणाचे आहे. कधीकधी हिवाळ्यात खराब हवामानामुळे लांब जाम असतो, त्यामुळे पूर्ण टाकीतील सीएनजी गोठू देत नाही आणि नेहमी उबदार असते, जेणेकरून तुम्हाला वाटेत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.