FD करताय ? ‘या’ बँका 5 वर्षांच्या एफडीवर देत आहेत सर्वाधिक व्याज, पहा संपूर्ण यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking FD News : 2023 हे वर्ष नुकतेच संपले आहे. 2024 ला सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षात अनेकांनी वेगवेगळे संकल्प केलेले आहेत. काही लोकांनी पैसाला पैसा जोडून पैसा वाढवण्याचे स्वप्न पाहिले आहे.

यासाठी या नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा संकल्प अनेकांनी घेतला आहे. खरे तर गुंतवणुकीसाठी भारतात वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यातलाच एक पर्याय आहे एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट याला मराठीत मुदत ठेव म्हणून ओळखले जाते.

मुदत ठेव हा गुंतवणुकीचा भारतातील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. आपल्या देशात अनेकजण बंपर परताव्यासाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतात. मात्र येथील गुंतवणूक ही थोडीशी रिस्की असते. म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक देखील शेअर बाजाराशीं निगडित असते,

यामुळे येथे देखील मोठी रिस्क असते. थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास थोडीशी कमी रिस्क असते. मात्र तरीही येथे असलेली रिस्क ही नाकारून चालत नाही. त्यामुळे अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी अजूनही पोस्ट ऑफिसची आरडी योजना,

बँकेतील एफडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसी मधील इतर अन्य बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य दाखवतात. खरे तर नुकत्याच 2023 हे वर्ष संपले आहे तसेच येत्या तीन महिन्यात 2023 24 हे आर्थिक वर्ष देखील संपणार आहे.

यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. एक मार्च 2024 पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत, अनेकजण कर वाचवण्यासाठी एफडी मध्ये गुंतवणूक करणार आहेत. यामुळे आज आपण एफडीवर सर्वोच्च व्याजदर देणाऱ्या बँकांची यादी पाहणार आहोत.

आज आपण पाच वर्षांच्या FD साठी कोणत्या बँका सर्वाधिक व्याज देत आहोत याविषयी जाणून घेणार आहोत. पाच वर्षांची एफडी ही करपात्र असते. यामुळे, गुंतवणूक करून जर आयकर वाचवायचा असेल तर या योजनेत गुंतवणूक करावी लागणार आहे.

पाच वर्षाच्या एफडीसाठी कोणत्या बँका देतात सर्वाधिक व्याजदर

एचडीएफसी बँक : 7 टक्के

आयसीआयसीआय बँक : 7 टक्के

अॅक्सिस बँक : 7 टक्के

कॅनरा बँक : 6.7 टक्के

युनियन बँक ऑफ इंडिया : 6.7 टक्के

स्टेट बँक ऑफ इंडिया : 6.5 टक्के

पंजाब नॅशनल बँक : 6.5 टक्के

बँक ऑफ बडोदा : 6.5 टक्के

इंडियन बँक : 6.25 टक्के

बँक ऑफ इंडिया : सहा टक्के