तिसऱ्या लाटेत धोका असल्याने निष्काळजीपणा करू नका !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने प्रभावी काम केले. मात्र टास्क फोर्सने सांगितलेल्या धोक्यानुसार तिसरी लाट मोठी असू शकते.

तिसऱ्या लाटेत धोका असल्याने निष्काळजीपणा करू नका, असे असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

अमृतवाहिनी कॉलेजमध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांच्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते.

आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, उपसभापती नवनाथ अरगडे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, महेंद्र गोडगे, सीताराम राऊत, विष्णुपंत रहाटळ, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री,

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, टास्क फोर्स समितीच्या डॉ. जयश्री जाधव, डॉ. योगेश निघुते, बी. आर. चकोर, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमतरतेमुळे मृत्यू झाले. स्थानिक प्रशासनाने प्रभावी काम केले.

मात्र तिसरी लाट भयानक आहे. या परिस्थितीत प्रशासनाने लागलीच शोध मोहीम सुरू करून तपासणी व ट्रीटमेंट सुरू करावे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण रुग्णवाढ रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय आहे.

अहमदनगर लाईव्ह 24