अफवांवर विश्वास ठेऊ नये; नागापूर अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यविधी सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना, नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी करण्यात येत आहे. काही राजकीय व्यक्तींनी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारास विरोध केला होता.

मात्र सदर स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यविधी पुर्ववत सुरु असल्याची माहिती अंतोन गायकवाड यांनी दिली. तर नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता या माणुसकीच्या कार्यास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेऊन नागापूर येथील स्मशानभूमीत कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यविधीची जबाबदारी स्विकारली आहे. काही राजकीय व्यक्तींनी या स्मशानभूमीत कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला होता.

यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला होता. मात्र या संकटकाळात राजकीय स्टंटबाजीला न जुमानता नागापूर स्मशानभूमीत अंत्यविधी पार पाडण्यास संघटनेचे सदस्य प्रयत्नशील आहेत.

स्मशानभूमी परिसरात लोकवस्ती नसल्याने नागरिकांना याचा धोका नाही. तर नागरिकांचा देखील विरोध नसल्याची माहिती कोरोना मृतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेणारे अंतोन गायकवाड यांनी दिली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24