Car Tips : कार चालवताना करू नका ‘या’ चुका, नाहीतर बॉम्बसारखी फुटेल तुमची कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Tips : सध्याच्या काळात कार वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, कार उत्पादक कंपन्यांही मागणी जास्त असल्याने कार मोठ्या प्रमाणात बाजारात घेऊन येत आहेत. कार चालवत असताना तिची देखभाल घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही तिच्या देखभालीकडे लक्ष दिले नाही तर तुमचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकते.

यापैकी एक म्हणजे तुम्ही कार चालवत असताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्याही कारचा एखाद्या बॉम्बप्रमाणे स्फोट होऊ शकतो.या कोणत्या गोष्टी आहेत? कोणत्या गोष्टी कराव्यात? करू नये. पाहुयात.

इंजिन तापमान पाहावे 

इंजिनच्या तापमानाबद्दल काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर गाडीचे इंजिन जास्त गरम झाले तर आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे, कारमध्ये इंजिन थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत, जसे की इंजिनजवळ पंखा बसवला जातो, ज्यामुळे इंजिनवर हवा वाहते. या शिवाय, इंजिन थंड ठेवण्यासाठी कूलंटचा वापर करण्यात येतो.

सध्या जवळपास सर्वच गाड्यांमध्ये इंजिनचे तापमान दर्शविण्यासाठी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर प्रकाश असतो, जे तापमान वाढल्यावर जळायला सुरुवात होते. हे लक्षात ठेवा की, हे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, नाही तर तुमच्या गाडीला आग लागण्याची शक्यता आहे.

सीएनजी गळतीवर लक्ष द्या 

जर तुम्ही सीएनजी कार वापरत असाल तर लिकेजची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, कारण सीएनजी कारमध्ये गळती होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे सीएनजी कार वापरणाऱ्या लोकांना सीएनजी गळती होत आहे असे जाणवले तर त्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. इतकेच नाही तर गळतीचीही वेळोवेळी तपासणी करायला पाहिजे.

तसेच गाडीत बसल्यावर सीएनजीच्या वासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सीएनजी लिकेज होत असल्यास तर त्या गाडीपासून दूर जा. हे लक्षात ठेवा की सीएनजी लिकेज झाले तर चुकूनही कार चालवण्याची चूक करू नका.

धूम्रपान करणे टाळा

कारमध्ये धुम्रपान करणे टाळावे. जर एखादी व्यक्ती कारमध्ये धुम्रपान करत असल्यास सीएनजी लिकेज असेल तर ती लगेच आग पकडते. अनेकदा ही आग भीषण असू शकते. त्यामुळे कारचा स्फोटही होऊ शकतो.