अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मी घाबरलो, खचलो मुळीच नाही, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका, अशी सुसाईड नोटा लिहीत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील फुरसुंगी परिसरात घडली आहे.
स्वप्निल लोणकर असे २४ वर्षीय युवकाचे नाव आहे. स्वप्निलच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.स्वप्निलनं अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती.
स्वप्निल हा मोठ्या जिद्दीनं एमपीएससीची परीक्षा देत त्यात उत्तीर्ण झाला होता. इंजिनिअरींग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं एमपीएससी च्या परीक्षेची तयारी सुरु केली. स्वप्निल २०१९ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला होता.
मात्र कोरोनाच्या निर्बंधामुळे त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. २०२० झालेल्या त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतही तो उत्तीर्ण झाला होता. स्वप्निलला दहावीत ९१ टक्के गुण मिळाले होते.
तो अनेक सामाजिक उपक्रमांमधेही तो सहभागी असायचा.परीक्षा उत्तीर्ण झालो की वडिलांनी गावाकडे घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज फेडाण्याचं स्वप्निलच स्वप्न होतं. बहिणीनं ही घटनेची तात्काळ माहिती आईवडिलांना दिली.
त्यानंतर स्वप्निलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हडपसर पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यात तो पास देखील झाला होता.
मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही आणि याच नैराश्यातून त्यानं हे पाऊल उचललं.आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निलनं सुसाईड नोट लिहिली होती. मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो.
माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका, असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.