अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-ऑनलाईन रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीचा बहाणा करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर ‘नीड रेमडेसिवीर इंजेक्शन’ फाॅर कोव्हिड-19 दोन ते तीन तासात उपलब्ध.
संपर्क साधा बँक खाते क्रमांक, गुगल पॅ ची माहिती असणारा इंग्रजीमध्ये मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या ‘मेसेज’मुळे नागरिकांच्या आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन हे सोशल मीडियाद्वारे विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
या चुकीच्या माहितीला नागरिकांनी बळी पडू नये. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल गुन्ह्याचा सायबर पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.