Car Care tips : चुकूनही कारच्या ग्लोव्हबॉक्समध्ये ठेवू नका या वस्तू, नाहीतर संकटात सापडाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Care tips : अनेकजण त्यांच्या कारची खूप काळजी घेतात तर अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांची कार वेळेआधी जुनी आणि खराब होते. प्रत्येक कारला ग्लोव्हबॉक्स असतो.

अनेकांना त्यात स्मार्टफोन, वाहनांची महत्त्वाची कागदपत्रे यांसारख्या खूप मौल्यवान वस्तू ठेवण्याची सवय असते. जर तुम्हालाही अशी सवय असेल तर ती आजच टाळा. नाहीतर तुम्हीही खूप मोठ्या संकटात सापडू शकता. या वस्तू कोणत्या आहेत पाहुयात सविस्तर यादी

कारची नोंदणी कागदपत्रे

अनेकांना ग्लोव्हबॉक्समध्ये कारची नोंदणी कागदपत्रे ठेवण्याची सवय असते. समजा तुमची कार चोरीला गेली तर त्यावेळी ती कार त्यावेळी कागदपत्रे उपयोगी येते. त्यामुळे नोंदणी कागदपत्रांची छायाप्रत तुमच्या वॉलेटमध्ये किंवा फोनमध्ये सॉफ्ट कॉपी ठेवणे गरजेचे आहे.

मौल्यवान वस्तू

चुकूनही कारच्या ग्लोव्हबॉक्समध्ये मौल्यवान वस्तू ठेवू नका. कारण चोर अशा संधीच्या शोधात असतात. त्यामुळे तुम्हाला कधीही मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

स्मार्टफोन

अनेकांना कार चालवत असताना आपला स्मार्टफोन ग्लोव्हबॉक्समध्ये ठेवण्याची सवय असते. बऱ्याचवेळा तो ग्लोव्हबॉक्समध्ये विसरला जातो. समजा तुमची कार जास्त वेळ उन्हात उभी राहिली तर फोनची बॅटरी गरम होण्याची शक्यता असते. परिणामी स्फोट होऊ शकतो.

पाकीट

पाकीट हे सर्वात महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये पैसे, डेबिट कार्डसारख्या वस्तू असतात. अनेकजण कार लॉक करत नाहीत. समजा एखाद्या चोरट्याला ते समजले तर ते या सगळ्या वस्तू घेऊन पसार होतील. त्यामुळे कारमधून बाहेर पडताना पाकीट सोबत ठेवा.

बिल

त्याचबरोबर कधीच खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल कारच्या ग्लोव्हबॉक्समध्ये ठेवू नका. कारण यामध्ये तुमचे नाव, फोन नंबर आणि क्रेडिट कार्ड नंबरसारखी इतर माहिती असते. तुमच्या या माहितीचा गैरवापर होऊ शकतो.