ताज्या बातम्या

रनिंग किंवा जॉगिंग करताना ‘या’ चुका करू नका

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :-  कोरोनाच्या काळात निरोगी शरीर हे किती महत्वाचे असते याचा अनुभव अनेकांना आला असेल. यामुळे निरोगी शरीरासाठी कसरत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे दिसून आले. यातच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे म्हणजेच रनिंग आणि जॉगिंग एक उत्तम उपाय आहे.

अनेक जण रोज रनिंग करतात. त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र रनिंग किंवा जॉगिंग करताना केलेल्या काही चुका आपल्याला महागात पडू शकतात. दरम्यान रनिंग-जॉगिंगवेळी काय काय काळजी घेतली पाहिजे याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

शारीरिक क्षमता ओळखा
जर तुम्हाला धावताना शरीराची साथ मिळत नसेल, तर विनाकारण जबरदस्तीने धावू नका. शक्य होईल तितकंच धावावं. याऊलट जबरदस्तीने धावल्यास तुम्ही त्वरीत थकू शकता, तसंच तुम्हाला अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

जेवण
रनिंग आणि जॉगिंगपूर्वी खूप काही खाऊ नये. पोटभर खाऊन धावल्याने पचनक्रियेवर आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.

पाणी
धावण्यापूर्वी खूप पाणी पिणे किंवा काहीच पाणी न पिणे हे धोकादायक आहे. धावण्यापूर्वी/धावताना थोडंस पाणी प्यावं.

फ्रेश न होणे  
लोक रनिंग किंवा जॉगिंगला जाण्यापूर्वी फ्रेश होत नाहीत, टॉयलेटला जात नाहीत. मात्र त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. लघवी किंवा संडासला न जाता व्यायाम करणं चुकीचं आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office