OnePlus 10T 5G : संधी गमावू नका! 50 हजारांचा वनप्लस मिळतोय 22099 रुपयांमध्ये

OnePlus 10T 5G : जर तुम्हाला OnePlus चा प्रीमियम स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus च्या लेटेस्ट स्मार्टफोनवर म्हणजेच OnePlus 10T 5G या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे.

या ऑफरमुळे 50 हजारांचा वनप्लस फक्त 22099 रुपयांमध्ये घरी आणू शकता. ही ऑफर काही वेळासाठीच असणार आहे त्यामुळे स्वस्तात वनप्लस खरेदी करण्याची संधी गमावू नका.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशी आहे ऑफर

OnePlus 10T 5G हा स्मार्टफोन जेड ग्रीन आणि मूनस्टोन ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही कलर व्हेरिएंट Amazon वर .49,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

तसेच तुम्हाला ICICI बँक कार्डने खरेदी करून तुम्ही या फोनवर 5,000 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट मिळवता येते. ज्यामुळे या फोनची किंमत 44,999 रुपयांपर्यंत खाली येईल. बँक ऑफर व्यतिरिक्त, या फोनवर सुमारे 22,900 रुपयांची सूट मिळत असल्याने या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होत आहे.

एक्सचेंज बोनस

या स्मार्टफोनवर Amazon तब्बल 22,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत असून तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असावा. तर तुम्हाला या स्मार्टफोनवर ही सवलत मिळेल. त्याशिवाय तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटवरही या ऑफरचा लाभ घेता येतो.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर,कंपनीने या फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी + फ्लुइड एमोलेड डिस्प्ले दिला असून हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग दरासह येतो. यामध्ये डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. तर फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे.

हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह येतो. फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत. यामध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 50-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4800mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 150W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. तर हा फोन Android 12 वर आधारित OxygenOS 12.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर या मध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, एनएफसी, जीपीएस आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय आहेत.