Realme Smartphone : भारतीय टेक बाजारात कंपन्या अनेक स्मार्टफोन लाँच करत आहे. मागण्या जास्त असल्याने या सर्वच स्मार्टफोनची किंमत जास्त आहे. अशातच काही दिवसांपूर्वी Realme या दिग्ग्ज स्मार्टफोन निर्माता कंपनीने Realme C35 हा स्मार्टफोन लाँच केला होता.
तो तुम्ही आता खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. कारण या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर आतापर्यंतची सगळ्यात मोठी सवलत मिळत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 13,999 रुपये इतकी आहे. परंतु तो तुम्ही आता सवलतींमुळे 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनीने यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिले आहे तर यात 50MP ट्रिपल कॅमेरा कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी दिला आहे.
फ्लिपकार्ट या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सुरू असणाऱ्या या विशेष सेल दरम्यान मोठ्या सवलतीत Realme स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. या सेलमध्ये फोनवर फ्लॅट डिस्काउंट तर मिळत आहेच, सोबत बँक आणि एक्सचेंज ऑफरमुळे त्याची किंमत आणखी कमी होत आहे. तुम्ही आता Realme C35 हा स्मार्टफोन 50MP ट्रिपल कॅमेरा आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन वेगवान चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीसह येत आहे.
कमी किमतीत खरेदी करा Realme C35
स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 13,999 रुपये आहे. परंतु 21% च्या सवलतीनंतर, फ्लिपकार्टवर तो तुम्ही 10,999 रुपयांमध्ये खरेदी शकता. जर ग्राहकांनी SBI बँक कार्डच्या मदतीने पेमेंट केले तर त्यांना 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाईल, त्यानंतर फोनची किंमत 9,999 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.
जर तुम्ही Axis Bank कार्डवरून पेमेंट केले तर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्सचेंज डिस्काउंटच्या रूपात ही मोठी सूट मिळू शकते. फोनवर 9,850 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट मिळत आहे, ज्याचे मूल्य जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असणार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही आता कंपनीचा हा फोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग ग्रीन कलर पर्यायांमध्ये Realme C35 खरेदी करू शकता.
स्पेसिफिकेशन्स
Realme स्मार्टफोन 6.6-इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले दिला जात जो 600nits पीक ब्राइटनेस देतो तसेच हा फोन वॉटर-ड्रॉप नॉचसह येतो. या फोनमध्ये Unisoc Tiger T616 प्रोसेसरसह 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. नंतर त्याचे स्टोरेज समर्पित मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसह 1TB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये Android वर आधारित Realme UI दिला आहे.
या फोनच्या मागील पॅनलवरील ट्रिपल कॅमेरा मॉड्यूलमध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 0.3MP ब्लॅक आणि व्हाइट लेन्ससह 50MP प्राथमिक सेन्सर उपलब्ध आहे. एकाधिक कॅमेरा मोड आणि 4x डिजिटल झूम सपोर्टसह येत असणाऱ्या या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनीच्या या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.