Power Banks under 2K : अशी संधी चुकवू नका! अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहेत ‘या’ शक्तिशाली पॉवर बँक

सध्या अनेकजण स्मार्टफोन वापरत आहेत. भारतीय टेक बाजारातही वेगवेगळे फीचर्स असणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Power Banks under 2K : स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन वापरत आहेत. आर्थिक व्यवहारांपासून ते चित्रपट बघण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी आता स्मार्टफोन महत्त्वाचा झाला आहे. फोनचा वापर दिवसभर करत असल्याने यात बॅटरी जास्त क्षमतेची असणे गरजेची आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ग्राहकांची गरज लक्षात घेता स्मार्टफोन कंपन्या आता शक्तिशाली बॅटरीसह येणारे स्मार्टफोन लाँच करत आहेत. त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही स्मार्टफोन सहज दिवसभर वापरू शकता. असे असले तरी आपल्याला अनेकदा पॉवर बँकची गरज पडते. या पॉवर बँक आता खूप स्वस्तात मिळत आहेत.

समजा जर आपण घराबाहेर पडलो आणि आपल्याकडे फोन चार्ज करण्याचा कोणताही पर्याय नसेल तर अडचण निर्माण शकते. म्हणूनच तुम्ही एक लहान डिव्हाइस म्हणजे पॉवर बँक तुमच्यासोबत ठेवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती खिशात सहज ठेवता येते आणि गरज पडेल तेव्हा फोन चार्जही करता येतो.

Advertisement

फोन चार्ज करण्यासाठी बेस्ट 20000 MAh पॉवर बँक आहे. जर तुम्हाला नवीन आणि परवडणारी पॉवर बँक घ्यायची असल्यास तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. खरं तर 20000 mAh बॅटरीसह येणाऱ्या काही पॉवर बँक्स आता मोठ्या सवलतींसह विकल्या जात आहेत. तुम्‍ही आता सवलत घेऊन पॉवर बँक विकत घेऊ शकता.

ओराइमो 20000 mAh पॉवर बँक

ही पॉवर बँक फ्लिपकार्टवर मूळ किमतीपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही ती 2499 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. त्याच्या किमतीवर 56 टक्के सूट देण्यात येत आहे. ही पॉवर बँक तुम्हाला 2499 रुपयांऐवजी अवघ्या 1099 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Advertisement

कॉलमेट 20000mAh पॉवर बँक

ही पॉवर बँक Flipkart वर त्याच्या मूळ किमतीच्या 2499 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. येथे पॉवर बँक 58% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तुम्ही ती फक्त रु.1049 मध्ये खरेदी करू शकाल.

सिस्का 20000 mAh पॉवर बँक

Advertisement

सिस्काची पॉवर बँक आता फ्लिपकार्टवर स्वस्तात उपलब्ध आहे. तुम्ही त्याच्या किमतीवर 61 टक्क्यांपर्यंत सवलत मिळवू शकता. त्याची मूळ किंमत रु.3199 असून तुम्ही ती 1219 रुपयात खरेदी करू शकता.