विनाकारण घराबाहेर पडून सर्वांचा जीव धोक्यात आणू नका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- कोरोनाने सर्वत्र हाहाकार सुरू आहे. अनेकजण भाजीपाला, किराणा या आवश्यक वस्तुंच्या नावाखाली विनाकारण बाहेर पडत आहेत.

काहींच्या गलथानपणामुळे सर्व व्यवस्थाच कोलमडून पडू शकते. एका दिवसांत १४ बळी गेले आहेत.

त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडून, गर्दी करून सर्वांचाच जीव धोक्यात आणू नका, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.

खरे तर आता आपण स्थानिक पातळीवर कडक नियम लावून संचारबंदी कठोरपणे राबवली पाहिजे.

तहसीलदारांनी यावर विचार करून काहीजणांची बैठक घ्यावी. स्वतःला, कुटुंबाला, कोपरगावला सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही वहाडणे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24