अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- जुलै २०२१ अखेर शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण करा. आता लोकभावनेचा अंत पाहु नका असा इशारा खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे.
पाथर्डी येथील शासकिय विश्रामगृहामधे बुधवारी आयोजित आढावा बैठकीत विखे बोलत होते. यावेळी शहरातील महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. खोदलेल्या खड्यात अनेकजण पडुन अपघात होत आहेत.
ठेकेदार हलगर्जीपणा करतो आणि अधिकारी त्याला पाठीशी घालतात असा आरोप बहुतेक कार्यकर्त्यांनी केला.
अधिका-यांचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर विखे संतापले. महामार्गाच्या कामाचा खेळ आता थांबवा. जुलै अखेरपर्यंत शहरातील रस्त्याचे काम पुर्ण करा असा सज्जड दम विखे यांनी अधिका-यांना भरला.
बैठकीनंतर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश पालवे व संतोष जिरेसाळ यांनी महामार्गाच्या कामाच्या तक्रारीचा पाढा वाचला. खासदार साहेब आले की अधिकारी येतात.
गोड बोलतात पुन्हा कामाकडे फिरकत नाहीत. आता ३० जुलै पर्यंत शांत राहु मात्र त्यांनतर मनसेचा दणका अधिका-यांना दाखवु असे म्हणाले.