ताज्या बातम्या

शेतकऱ्याचा नांद नाही करायचा!! पूर्वमशागतीसाठी बैलाऐवजी घोड्यालाच जुंपले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news  :- पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत यामुळे याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य वर्गाला बसत आहे.

डिझेलच्या किमतीत अवाजवी वाढ होत असल्याने शेतकरी बांधवांना देखील याचा मोठा फटका बसत असून आता शेती मधील मशागतीचे (Pre Cultivation) कामे महाग झाली आहेत.

यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) आता ट्रॅक्टरने मशागत करणे परवडेनासे झाले आहे. वाशिम तालुक्यातील (Washim) मौजे शेलगाव येथील भाऊराव धनगर या शेतकऱ्याला देखील इंधन दरवाढीचा फटका बसला असून मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ट्रॅक्टरने मशागत महागली शिवाय बैलांना पोसने देखील महागच असल्याने या शेतकऱ्याने ट्रॅक्टर व बैलांऐवजी चक्क घोड्याने औतकाम सुरू केले आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही घोड्यांना मशागतीला जुपन्याआधी प्रशिक्षण देण्यात आले आहे. ट्रॅक्टर व बैलांने मशागत करणे दिवसेंदिवस महाग होत असल्याने या शेतकऱ्याने आपल्या दावणीला असलेल्या घोड्यांना औताला जुपले आहे.

विशेष म्हणजे घोड्यांद्वारे मशागतीचे कार्य अतिशय वाऱ्याचे वेगाने होऊ लागली आहेत. यामुळे या शेतकऱ्याचा मशागतीसाठी होणारा खर्च वाचत असल्याचे सांगितले जात आहे.

भाऊराव धनगर आपल्याजवळ असलेल्या घोड्यांचा वापर दळणवळण करण्यासाठी करत असतात. त्यांचे शेत गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असल्याने ते घोड्यांचा वापर करून शेतीत जातात तसेच बी-बियाणे देखील घोड्यांच्या माध्यमातून शेतात पोहोचवले जाते.

आणि आता घोड्याद्वारे मशागत होत असल्याने भाऊराव यांना दुहेरी फायदा होत आहे. लग्नाच्या वरातीत घोड्यांना नाचवण्यासाठी भाऊराव यांनी या घोड्याला विशेष प्रशिक्षण दिले होते.

मात्र प्रशिक्षण घेऊनही हे घोडे लग्नाच्या वरातीत काही नाचले नाही. मात्र, शेतीची मशागत करण्यासाठी या घोड्यांचा आता उपयोग होऊ लागला आहे.

भाऊराव यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी एक छोटासा घोडा खरेदी केला होता. हा घोडा मोठा झाला म्हणून त्याला दुसऱ्या घोड्याची जोड दिली जावी असा भाऊराव यांनी विचार केला आणि त्या अनुषंगाने अजून एक घोडा खरेदी केला. भाऊराव यांनी आपल्या दोन्ही लाडक्या घोड्यांची नावे राजा आणि तुळशी अशी ठेवली आहेत.

Ahmednagarlive24 Office