अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा असलेले अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करा. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर निकषाचे आधारे श्रीरामपुर जिल्हा करावा,
अशी जोरदार मागणी राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचेकडे श्रीरामपुर जिल्हा सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी करुन निवेदन दिले आहे. पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ हे 1 मे कामगार दिनी अहमदनगर येथे विश्राम गृहावर आले होते.
याप्रसंगी ना. हसन मुश्रीफांनी करोना संकटात व्यस्त असतांना देखील लांडगे यांचेशी त्रिभाजन होण्याचे आर्तहाकेचे निवेदन स्वीकारले. यावर आपण करोना संकटातून लवकरच मार्ग काढु. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांची मला जाण आहे.
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जिल्हा विभाजन प्रश्नाची प्राधान्याने सोडवणूक करणार आहे असे सहानुभूतीपुर्वक आश्वासन राजेंद्र लांडगेंना दिले. प्रसिद्धीस दिलेले निवेदनात राजेंद्र लांडगे म्हणाले कि, करोना महामारी संकटावर मात करणेसाठी त्रिभाजन हाच एकमेव पर्याय सर्वार्थाने प्रभावशाली ठरणार आहे.
याकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी सामाजिक भावनेतून पाहुन उच्चस्तरावर अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत.आज करोना महामारी संकटात थेट सेवाकार्य करणारे प्रशासनासह आरोग्य सेवक, स्वच्छता सेवक, पोलीस दल प्रसारमाध्यमांवर प्रमाणापेक्षा जास्त ताण पडत आहे.
सद्यस्थितीत मनूष्यहानीने चिंता वाढली आहे. योगायोगाने जिल्ह्यातील ज्येष्ठ नामदार बाळासाहेब थोरात साहेबांकडे महसूल खाते आहे. आज त्यांचेच अधिपत्याखाली महसूल विभाग देशात प्रथमस्थानी आहे.
ही परंपरा कायम राखण्यासाठी ना.थोरात अहमदनगरचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करतील असा आत्मविश्वास लांडगेंनी व्यक्त केला आहे. या सामाजिक प्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांचेसह उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार,
जिल्ह्यातील ज्येष्ठ महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख आणि नगर विकास, ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे आणि जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना ट्वीटरद्वारे मागणी करणार आहे.
तसेच आजमितीला प्रत्येक शासकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्षात होत नाही. त्यामुळे मुठभर नफेखोर करोना महासंकटातही गैरफायदा घेताना दिसत आहे. यासाठी महराष्ट्र राज्याने कायमच देशासह जगात अव्वलस्थानी राहण्यासाठी एकविसाव्या शतकाचे कागदोपत्री
घोडे न नाचवता प्रत्यक्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे महसुल उत्पन्नात देखील अचुकता येत महसुलात वाढ होईल. यासाठी छोटे छोटे जिल्हे करुन नवीन तालुक्यांची निर्मीती करुन ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाला जोडावीत.यामुळे प्रशासकीय खर्चासह सुसूत्रतेवर नियंत्रण येईल.
असे झाल्यास महसुल वाढीसह प्रशासन आणखीन गतीमान होऊन प्रत्यक्षात अचुकता निर्माण करेल. त्याच बरोबर सद्यस्थितीत प्रशासनाने अनेक धुळखात पडलेल्या इमारतींची किरकोळ डागडुजी करुन प्रत्यक्षात वापरात आणाव्यात. त्याच बरोबर उच्चपदस्थ अतिरीक्त पदभार सांभाळणे ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी.
भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती संकट आटोक्यात आणण्यासाठी तातडीने अनेक उपाययोजना आखणे अपेक्षित आहे. याचाच एकभाग म्हणून सन 2021 चे जनगणनेमध्ये अचुकता दाखवावी. या पार्श्वभूमीवर निकषाचे आधारे प्रायोगीक तत्त्वावर कमी खर्च येणारा असलेला
श्रीरामपूर जिल्हा पहिल्या टप्प्यात होण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी युध्द पातळीवर एकत्र येतील. आणि पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ नगरचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करतील अशी अपेक्षा राजेंद्र लांडगे यांनी भ्रमणध्वनीवरुन आमचे प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.