कोरोनातून बरे झाल्यानंतर बेफिकिरी नको ! वाचा काय घ्यावी काळजी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला वाईट प्रकारे प्रभावित केले. दिलासा एवढाच की रोज लाखोंच्या संख्येने लोक बरे होत आहेत. पण संक्रमण मुक्त झालेल्या लोकांनी अद्यापही दक्षता बाळगायची आहे. बिशेषज्ञांच्या मते बऱ्या झालेल्या लोकांमध्ये फुफ्फुसे व शरीराचे इतर भागांशी संबंधित समस्या ठीक होण्यास थोडा वेळ लागतो.

* म्यूकरमायकोसिस : – हे एक फंगल इंफेक्शन असते, ज्यात श्‍वासनलिका जाम होते व श्‍वास घेण्यास त्रास होतो. याची लक्षणे बरीचशी दसम्यासारखी असतात. अशावेळी रुग्णाने पूर्ण आराम करायला हवा. औषध वेळच्या वेळी घ्यायला हवीत. शारीरिक श्रम कमी करावेत.

* पल्मोनरी फायब्रोसिस : – या स्थितीत फुफ्फुसातील काही पेशी कायमस्वरूपी क्षतिग्रस्त होतात. याला फुफ्फुस जन्य गंभीर रोगांमध्ये ठेवले जाते. जर कोव्हिंड सक्रमण गंभीर राहिले असेल व रुग्ण दीर्घकाळ ऑक्सिजनथेरपीवर राहिला असेल तर नंतर जास्त लक्ष द्यायला हवे.

* डायबिटीस आणि बीपी : – उपचारात रुग्णांना दिली जाणारी काही स्टेरॉइड व औषधे पुढे मधुमेह व बीपीची समस्या निर्माण करू शकतात. वास्तविक कोरोनाचे संक्रमण शश्‍वसनप्रणालीसोबतच सपूर्ण शरीराला प्रभावित करीत असते. ज्यामध्ये रोगांची लढण्याची क्षमता कमकुवत होत असते.

* आयजीजी अँटीबॉडी टेस्ट : – यात संक्रमणातून बरे झाल्यानंतर रुग्णाच्या रक्तात असलेल्या अँटीबॉडीज पातळी कळते.

* कंप्लीट ब्लड काउंट (सीबीसी) : – लाल व पांढऱ्या रक्‍तपेशींसोबत पलेटलेट्स तपासतात. ज्यामुळे कोरोनामुळे शरीरावर झालेला प्रभाव समजते.

* व्हिटॅमिन-डी टेस्ट : – कोरोना संक्रमणकाळात शरीरात व्हिटॅमिन-डी वेगाने कमी होते. याची टेस्टही आवश्यक असते.

* हार्ट इमेजिंग व कार्डियक स्क्रीनिंग : – कोव्हिड संक्रमण हृदयाच्या स्नायूंचे नुकसान करू शकते. मध्यम व गंभीर संक्रमणातून बाहेर पडलेले रुग्ण या गोष्टीची तक्रार करीत असतात.

* एचआर-सीटी : – श्‍वासाशी संबंधित समस्या असल्यास ही करबली जाऊ शकते.

* ग्लुकोज व कोलेस्ट्रॉल टेस्ट : – जर रुग्ण पूर्वीपासूनच या समस्यानी पीडित असेल तर हृदयाची नियमित टेस्ट आवश्यक असते.

हळूहळू पूर्वपदावर या :-

* खाणे-पिणे व जीवनशैलीत संतुलन टिकवून ठेवा. शारीरिक श्रम जास्त करू नका.

* पुढील काही महिने शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष ठेवा. त्रास होत असल्यास डॉक्टरांना सांगा.

* बरे झाल्यानंतरही ऑक्सिजन लेव्हल सामान्य होत नसेल तर घाबरू नका. डॉक्टरांशी बोला. शश्‍वासासंबंधित व्यायाम करा. तणावमुक्त राहा व सकारात्मक विचार करा.

* उपचारादरप्यान ऑक्सिजन थेरपी घेतलेल्या लोकांनी बिशेष काळजी घ्या. आपली कार्यक्षमता हळूहळू वाढवा जेणेकरून फुफ्फुसांवर एकदम प्रेशर पडणार नाही.