Indian Railways : देशातील कितीतरी लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. आपल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने खूप सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. परंतु, प्रवासादरम्यान अनेकांचे रेल्वेमध्ये सामान चोरीला जाते.
जर तुमचेही सामान चोरीला गेले असेल तर काळजी करू नका तुमचे सामान मिळाले नाहीतर रेल्वेच तुम्हाला भरपाई देईल. अनेकांना रेल्वेचा हा नियम माहित नसतो. काय आहे हा नियम जाणून घ्या.
जर तुमचे रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान सामान चोरीला गेले तर तातडीने तक्रार नोंदवा. तुम्ही तक्रार दिल्यानंतर त्यावर कारवाई झाली तर रेल्वे तुमच्या चोरीच्या सामानाची भरपाई देते.
त्यापूर्वी हे लक्षात घ्या की तुम्हाला भरपाई मिळवायची असेल तर तुम्हाला काही एक काम करावे लागेल. तरच तुम्हाला नुकसानभरपाईचा लाभ मिळतो.
भारतीय रेल्वेच्या वेबसाइटनुसार, तुमचे रेल्वेमध्ये सामान चोरी झाले तर तुम्ही कोच अटेंडंट, ट्रेन कंडक्टर, जीआरपी एस्कॉर्ट किंवा गार्ड यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला एक एफआयआर फॉर्म मिळेल.
हा फॉर्म भरल्यानंतर तो पुढील कारवाईसाठी पोलिस ठाण्यात पाठवण्यात येईल. त्यानंतर रेल्वेकडून तुमच्या सामानाची तपासणी केली जाईल. जर वस्तू तपासणीत आढळली नाही तर रेल्वे तुम्हाला त्या सामानाची भरपाई देईल. काहीवेळेस ही भरपाई वस्तूंच्या किमतीपेक्षा कमी असते.