Indian Railways : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कधी कधी काही कारणांमुळे रेल्वेला उशीर होतो त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु, आता जर तुमच्या रेल्वेला उशीर झाला तर काळजी करू नका.
कारण आता रेल्वेला उशीर झाला तर तुम्हाला रेल्वे प्रशासनाकडून रिफंड मिळणार आहे. अनेक प्रवाशांना रेल्वेच्या या नियमांबद्दल माहिती नाही, त्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे काय आहे रेल्वेचा हा नियम? रिफंड कसा मिळवायचा? ते जाणून घेऊयात.
रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेला 3 तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर संबंधित त्या प्रवाशांना त्यांची रेल्वे तिकिटे रद्द करून परतावा मिळू शकतो. प्रवाशांना परतावा कसा मिळेल पाहुयात सविस्तर.
परंतु, त्या अगोदर हे लक्षात ठेवा की भारतीय रेल्वेची ही सुविधा फक्त त्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे ज्यांनी काउंटरवरून रेल्वेचे तिकीट घेतले आहे. याशिवाय प्रवाशांना आता ऑनलाइन तिकिटांवरही ही सुविधा घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, परतावा मिळवायचा असेल तर त्यासाठी, तुम्हाला टीडीआर दाखल करावा लागणार आहे. TDR फाइल करण्यासाठी, प्रथम तुम्हाला IRCTC खात्यात लॉग इन करावे लागणार आहे.
ही प्रक्रिया केल्यानंतर आता तुम्हाला खात्यातील व्यवहाराचा पर्याय निवडावा लागणार आहे. येथे तुम्ही My TDR च्या पर्यायावर क्लिक करून सहज TDR दाखल करू शकता. जर तुम्ही ही प्रक्रिया केली तरच तुम्हाला परतावा मिळेल.