Ayushman Card : तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका? नाहीतर होईल फसवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ayushman Card : देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने एक चांगली योजना सुरू केली आहे. आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला हेल्थ कार्ड दिल जाते,

ज्याद्वारे त्याला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळतात. या हेल्थ कार्डला आयुष्मान गोल्डन कार्ड असेही म्हणतात. परंतु, काही चुकांमुळे तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे काही चुका करणे टाळावे. कोणत्या आहेत त्या चुका पाहुयात.

 

लक्षात ठेवा या गोष्टी

क्रमांक १

आयुष्मान कार्ड बनवण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे लोकांना बनावट कॉल, बनावट संदेश किंवा बनावट ईमेलकरून फसवत्तात. त्यांची गोपनीय बँकिंग माहिती घेऊन लोकांची फसवणूक करतात. म्हणूनच तुमची बँकिंग माहिती कोणाशीही शेअर चुकूनही शेअर करू नका.

क्रमांक २

सध्या केवायसीच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत आहेत. लोकांना त्यांच्या गोड बोलण्यात अडकवून ते लोकांना आयुष्मान कार्डसाठी केवायसी करायला सांगतात. तुम्हाला लिंक पाठवतात किंवा तुमच्याकडून तुमची माहिती घेतात. तुम्हीही असे करत असाल तर सावध व्हा.

क्रमांक ३

कधीही OTP कोणत्याही अनोळखी कॉलला शेअर करू नका. फसवणूक करणारे तुम्हाला आयुष्मान कार्डसाठी अर्ज करण्याच्या नावाखाली खोटे कॉल करून तुमच्याकडून तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.

क्रमांक ४

जर कधी अशी लिंक तुमच्या मोबाईल मेसेज किंवा सोशल मीडियावर आली, तर अशा लिंकवर कधीही क्लिक करू नका कारण या खोट्या लिंक्स आहेत. तुम्ही त्यांच्यावर क्लिक करताच ते तुम्हाला तुमची माहिती विचारतील किंवा तुम्ही लिंकवर क्लिक करताच तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.