अभा मसाप आयोजित डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून कवी डॉ.अमोल बागुल यांची निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- हजारो साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून वंचित कवी-लेखकांच्या साहित्यकृतींना मानाचे स्थान मिळवून

देणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणेच्या माध्यमातून तिसऱ्या अखिल भारतीय मा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून

संमेलनाध्यक्ष म्हणून येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित साहित्यिक शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागूल यांची निवड करण्यात आली असून

संमेलनाचे उद्घाटक म्हणून श्री.रामदास आठवले(केंद्रीय समाज कल्याण मंत्री),प्रमुख अतिथी म्हणून महादेव जानकर (माजी पशुसंवर्धन मंत्री तथा आमदार), अभामसापचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संस्थापक व सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

रविवार दिनांक ४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वा. ऑनलाईन समाज माध्यमांवर संपन्न होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी अभामसापच्या जगभरातून विविध शाखांमधून मराठी सारस्वत साहित्य रसिक उपस्थित राहणार आहेत.

अभामसापच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर,परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त व साहित्यिक ज्ञानेश्वर पतंगे,रवींद्र पाटील-प्रदेशाध्यक्ष (कर्नाटक),आनंद शेंडे-अध्यक्ष (विदर्भ प्रदेश), राजश्री बोहरा सुप्रसिद्ध साहित्यिका

तथा अध्यक्ष मुंबई प्रदेश आदी मान्यवर ऑनलाईन अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.कविसंमेलन आणि परिसंवाद चर्चासत्रे तसेच विविध साहित्यकृतीच्या पुस्तकांसाठी पुरस्कार असे साहित्य संमेलनाचे स्वरूप आहे.

कवी,लेखक,साहित्यिक म्हणून डॉ.बागूल यांच्या काव्यलेखन,कथालेखनाच्या माध्यमातून अनेक साहित्य कृती दिवाळी अंक,मासिके,साप्ताहिके व दैनिकातून प्रकाशित झाल्या आहेत.

साहित्यनिर्मितीसाठीचे अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार व पारितोषिके त्यांना प्राप्त झाली आहेत.दर्जेदार साहित्य निर्मितीच्या माध्यमातून डॉ. बागूल यांचे अनेक संशोधनात्मक शोधनिबंध,पुस्तक समीक्षणे नियतकालिकातून प्रसिद्ध झालेआहेत.

नाटक,लघुपट,माहितीपटासाठी संहिता लेखन तसेच अनेक साहित्यिक कार्यक्रमांची सूत्रसंचालने डॉ.बागुल यांनी केली आहेत. बागुगल वेबसाईटच्या माध्यमातून साहित्यिक उपक्रमांना चालना, पाठ्यपुस्तकातील कवितांचे सार्वजनिक ठिकाणी गायन,ऑनलाइन तथा ऑफलाइन पद्धतीने अनेक देशांमध्ये बागूल यांनी या कवितेचे कार्यक्रम संपन्न केले आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यातील तसेच जगातील विविध देशातील मराठी भाषिकांसाठी तसेच कवी,लेखक,साहित्यिकांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे व त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून भारतातील

तथा जगातील मराठी भाषिक,रसिक,वाचक,प्रेक्षकांसाठी विविध कवी संमेलने,साहित्य संमेलने,परीचर्चा,परिसंवाद,साहित्यकृतींसाठी पुरस्कार,पुस्तक निर्मिती,ग्रंथप्रकाशन,ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबवले जातात. गाव,तालुका,

जिल्हा तथा राज्य पातळीवर सदस्य होण्यासाठी तथा शाखा स्थापन करण्यासाठी इच्छुकांनी श्री.शरद गोरे यांच्याशी 9422 300 362 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24