जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव द्यावे बहुजन समाज पार्टीची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- सावेडी उपनगरातील जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन महापौर रोहिणी शेंडगे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, राजू भिंगारदिवे, संजय भिंगारदिवे, राहुल बरबडे, वैभव जाधव आदी उपस्थित होते.

मौजे सावेडी येथील टीपी स्किम 4 मधील फायनल प्लॉट नंबर 121 व 122 मधील जमीन महार वतनाची इनामी आहे. सदर प्लॉटमधून जाणार रस्ता हा समाज मालकीची वारसा हक्काची जमीन शासनाने वर्ग केलेली आहेत.

त्याबाबत मौजे सावेडी येथील टीपी स्किम 4 मधील कुष्ठधाम रोडवरून जाणारा सावेडी पूर्व जुना भिस्तबाग रोड ते रासनेनगर ते सावेडी गावठाणास जोडणार्‍या रस्त्यास

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचे नांव देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच निवेदनावर स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Ahmednagarlive24 Office