डॉ. शेळके आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा ‘त्या’ ग्रामस्थांची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  डॉ.गणेश शेळके यांच्या आत्महत्येप्रकरणी पाथर्डी तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांची सीबीआय चौकशी करावी.

अशी मागणी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील ग्रामस्थांनी करत,याबाबत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना निवेदन दिले आहे.

अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी  तालुक्यातील करंजी आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

ही आत्महत्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून केली असल्याचे सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. डॉ. शेळके यांच्या आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होऊन दोषीस तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी याबाबत गांभीर्याने घेतले नाही. अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याऐवजी आत्महत्या प्रकरणी जबाबदार असलेल्या डॉटरांना सक्तीच्या रजेवर पाठवले तर पाथर्डीचे तहसीलदार हे देखील जबाबदार असून त्यांचेवर काहीही कारवाई अद्याप केलेली नाही.

म्हणजे पालकमंत्री हे दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ देऊन नगर जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत. तरी याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.

जोपर्यंत डॉ.शेळके यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे नमूद केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24