अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघात युवकांचे मोठे संघटन करणारे शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांना शासकीय महामंडळावर संधी द्यावी अशी मागणी शेवगाव-पाथर्डी राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डॉ. क्षितिज घुले हे जवळपास पाच वर्षापासून पंचायत समिती कारभार पाहत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शेवगाव पंचायत समितीस पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च यशवंत पंचायत राजचा ग्रामविकास विभागाचा राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे .
तसेच गेल्या दोन वर्षापासून महामारी कोरोना संक्रमणाच्या काळात कोविड सेंटर उभारून उल्लेखनीय असे कार्य युवक सहकारी यांच्या सहकार्याने केले आहे . तसेच शेवगाव – पाथर्डी मतदार संघ दुष्काळी असून पाटपाण्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृतीसमिती स्थापन करून यशस्वी लढा दिला .
तसेच विधानसभा व लोकसभा निवडनुकीच्या काळात गावोगावी जाऊन पक्षाचा व पक्षाच्या उमेदवाराचा नेटाने प्रचार केला . विधानसभेला शेवगाव तालुक्यातून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून दिले .
अशा कार्य तत्पर युवा नेत्यास शासकीय महामंडळावर नेमणूक द्यावी अशी आग्रही मागणीचे निवेदन शेवगाव- पाथर्डी मतदार संघाच्या वतीने नामदार प्राजक्त तनपूरे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, शेवगाव पंचायत समितीचे उपसभापती राहूल भोंगळे,शेवगाव राष्ट्रवादी कॉंगेस पार्टीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे,पाथर्डी तालुका राष्ट्रवादी युवक कॉंगेस अध्यक्ष चंद्रकांत मरकड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरूडे,
शेवगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कमलेश लांडगे,शेवगाव पंचायत समिती सदस्य शिवाजी नेमाणे,युवक नेते रोहन साबळे,संतोष जाधव,कृष्णा सातपूते,अशोक मरकड,आकाश शिंदे,सतिष शेळके आदींसह शेवगाव पाथर्डी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.