अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-तारकपूर बस स्टॅण्ड समोर मेडिकल दुकानात विसरलेली पैश्याची पिशवी मेडिकलचे संचालक आनंद तेजमल धोका यांनी प्रमाणिकपणा दाखवित डॉ. कथुरिया यांच्या हस्ते वैभव शेळके यांना परत केली.
वैभव शेळके कर्जतहून उपचारासाठी तारकपूर बस स्थानक समोर डॉ. कथुरिया यांच्याकडे सकाळी आले होते. औषध घेण्यासाठी ते आनंद मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्समध्ये आले.
मात्र त्यांची एक पिशवी दुकानात राहिल्याचे मेडिकलचे संचालक आनंद तेजमल धोका यांच्या निदर्शनास आले. त्यांने ती पिशवी उघडली असता त्यामध्ये रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी या संदर्भात डॉ. कथुरिया यांना सांगितले मात्र शेळके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दुपारी उशीरा शेळके यांना पिशवी हरवल्याची जाणीव झाली.
त्यांनी पिशवी शोधत मेडिकल स्टोअर्समध्ये आले असता आनंद धोका यांनी त्यांची ओळख पटवून सदर पैश्याची पिशवी डॉ. कथुरिया यांच्या हस्ते परत दिली.
मेडिकल चालकाचा प्रमाणिकपणा पाहून शेळके भारावले. त्यामध्ये 70 हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगून पैश्याची पिशवी परत दिल्याबद्दल आभार मानले.