Driving License : देशात वाहन चालवण्यासाठी अनेक नियम बनवण्यात आले आहेत. जर तुम्हीही वाहन चालवत असाल तर तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोणतेही वाहन चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे आहे.
जर तुम्ही वाहन चालवत असाल आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमच्यावर आरटीओ अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स महत्वाचे आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स हे १८ वर्षावरील किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांसाठी बनवले जाते. १८ वर्षाखालील व्यक्तींना वाहन चालवण्यास परवानगी नाही. तसेच जर असे केल्यास तुमच्याकडून दंड देखील आकारला जाईल आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो.
भारतमध्ये १८ वर्षावरीलच नागरिकांना वाहन चालण्याची परवानगी दिली जाते. जर तुमचेही ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल तर काळजी करू नका. कारण ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यानंतर काही सोपे पर्याय आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता.
डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स कसे बनवायचे
जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर तुम्ही सहज डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला हरवलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सची एफआयआर पोलिस ठाण्यात द्यावी लागेल.
तसेच तुम्ही केलेल्या एफआयआरची प्रत घ्या आणि या एफआयआर प्रतद्वारे तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. यानंतर तुम्हाला आरटीओकडून डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईल.
याप्रमाणे करा डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज
प्रथम परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
या वेबसाइटवर विचारलेल्या सर्व तपशीलांसह एलएलडी फॉर्म भरा
फॉर्म भरल्यानंतर, या फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि शुल्क देखील ऑनलाइन भरा.
यानंतर आरटीओ कार्यालयात फॉर्म सबमिट करा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट डीएल मिळेल.
तुम्ही आरटीओ कार्यालयात जाऊनही फॉर्म भरू शकता,
जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्सला अर्ज करायचा नसेल तर तुम्ही आरटीओ कार्यालयात जाऊन देखील अर्ज करू शकता. या ठिकाणी जाऊन तुम्हाला LLD फॉर्म भरावा लागेल तसेच त्यासोबत फी देखील जमा करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ३० दिवसांमध्ये डुप्लिकेट लायसन्स दिले जाईल.
पावती जपून ठेवा
तुम्ही आरटीओ कार्यालयात डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला त्यानंतर एक पावती दिली जाईल. गरज पडल्यास तुम्हाला ही पावती पुन्हा मागितली जाऊ शकते. तसेच या पावतीद्वारे तुम्ही तुमचे डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स ट्रॅक करू शकता.