अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- मुंबईतील एका क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये मुनमुन धमेचा या तरुणीचाही समावेश आहे.
यामुळे सध्या सोशल मीडियावरही मुनमुन धमेचा हिच्या नावाची चर्चा होती. क्रुझवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्ज पार्टीवर प्रकरणी अटक करण्यात आलेला आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांची जामीनावर शनिवारी सुटका करण्यात आली.
ऑर्थर रोड कारागृहातून हे दोघेही आपापल्या घरी रवाना झाले. परंतु या प्रकरणात अटक करण्यात आलेली मुनमुन धमेचा ही मात्र अद्याप तुरुंगातच आहे.
न्यायालयाने जामीनासाठी एक लाख रुपयांचा जामीनदार जमा करण्यास सांगितले आहेत. परंतु तितक्या पैशांची तजवीज तिला करता न आल्याने मुनमुनची अद्याप सुटका झालेली नाही.
नमुन धमेचा हिचे वकील आता रोख पैसे भरून तिचा जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
मुनमुन धमेचा ही मध्य प्रदेशची आहे. त्यामुळे तिला जामीनदार मिळवण्यासाठी आणि यासाठी लागणारी रक्कम गोळा करण्यातही अडचणी येत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी मुनमुनच्या वकीलांना सुटी कालीन न्यायालयामोर हा अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. याआधी उच्च न्यायालायत झालेल्या युक्तीवादावेळी मुनमुनचे वकील अली काशिफ खान देशमुख यांनी तिला झालेली अटक बेकायदा असल्याचा दावा केला होता.