अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- राहुरी पोलीस ठाण्याच्याआवारात दि. 11 ऑगस्ट रोजी दारू पिऊन आरडाओरडा करणार्या दोघा जणांवर राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तुकाराम रामकृष्ण राजदेव (वय 35 वर्षे) व संदिप नामदेव राजदेव (वय 30 वर्षे दोघे रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे
याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवार रोजी संध्याकाळी साडेसात वाजे दरम्यान आरोपी तुकाराम राजदेव व संदिप राजदेव हे दोघे राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात दारूच्या नशेत आले.
त्यावेळी त्यांनी काहीतरी कारणावरून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून गैरवर्तन केले. राहुरी पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेत त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.
पोलीस हवालदार महेंद्र गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास हवालदार दिनकर चव्हाण हे करीत आहेत.