अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या लग्न झालेल्या लेकीवर वडिलांनी बलात्काराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचा नुकताच विवाह झाला. आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी ती माहेरी आली होती. मुलगी घरात झोपलेली असताना वडिलांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
सोमवारी मुलगी घरामध्ये झोपलेली होती. आरोपी वडील दारू पिऊन घरी आले. घरी आल्यावर त्यांनी मुलीला वाईट हेतून हात लावायचा प्रयत्न केला.तसेच धमकी देऊन तोंड बंद ठेवायला सांगितलं.
मात्र मुलीने आरडाओरडा केला आणि आईला सगळा प्रकार लक्षात आला. पीडित मुलीने सांगितले की, याआधीही तिच्यावर वडिलांनी लैंगिक अत्याचार केले होते. मात्र तिने त्याची कधीच वाच्यता केली नाही.
तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला अटक केली तेव्हा तो दारूच्या नशेत होता. पीडितेला कोर्टात हजर करुन जबाब नोंदवला जाणार आहे. आरोपीला सध्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.