अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकाने आक्रमक व कठोर पाऊले उचलली आहे.
यातच जिल्ह्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यू लावला आहे. यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहे.
दरम्यान बेजबाबदार नागरिकांकडून नियमांची पायलमल्ली केली जात असल्याने जल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून आला. यातच सर्वाधिक रुग्णवाढ हि नगर शहरात होत होती.
वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याने कडक निर्बंध लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याने मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी तीन मेपासून ते दहा मेपर्यंत असे सात दिवस शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत.
त्यानुसार यादरम्यान किराणा माल विक्री तसेच फळे, भाजीपाला, अंडी, मटण, मासे विक्रीला पूर्ण बंदी घातली गेली आहे. नागरिकांना केवळ हॉस्पिटल, दवाखाना या कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
विनाकारण फिरताना आढळल्यास मनपा प्रशासन, पोलीस अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करून वाहने ताब्यात घेतील. तसेच रोख रकमेचा दंड आकारण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.