अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मास्कचा वापर करण्याचा नियम अधिक कडक करण्यात आला आहे. तसंच पोलिसांना रस्त्यावर उतरून कारवाईचा आदेश देण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळपासूनच कारवाई सुरू केली आहे.

बाजारपेठेसोबतच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या विना मास्क नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,

महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यावेळी उपस्थित होते.