अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता परराज्यातून येणाऱ्या साईभक्तांची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन घेऊ साईबाबा संस्थानच्या वतीने साईभक्त भाविकांना प्रसाद रुपी देण्यात येणार लाडू प्रसाद वितरण गर्दीच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आले आहे.
शिर्डी शहरात येणाऱ्या साईभक्तांना साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रसाद रूपी लाडू प्रसादाचे पाकीट विक्री माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असते.
त्यासाठी विविध ठिकाणी काउंटर देखील सुरुवात करण्यात आलेले आहेत, असे असताना काही दिवसांपूर्वीच बंद असलेली ही लाडू विक्री सुरुवात करण्यात आली होती.
परंतु कोरोनाच्या धर्तीवर साईभक्त भाविकांची कमी होत असलेली गर्दी त्यामुळे हे लाडू पाकीट खराब होऊ नये
अथवा पडून राहू नये या दृष्टिकोनातून साईभक्तच्या कमी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन थांबवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.