मजुरांअभावी ऊसतोडणीसाठी मशीन आणले तेही जळून खाक झाले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-उसतोडणीसाठी कामगार मिळत नसल्यामुळे त्यावर उपाय म्हणून अनेक साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत.

मात्र ऊस तोडणीसाठी असलेले यंत्रच जाळून खाक झाल्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे.

यामुळे यंत्र मालक हनुमंत बाबुराव बारगजे राहणार अकोला (ता. पाथर्डी) यांचे सुमारे ७५ लाखाचे नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शेवगाव तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने शेवगाव तालुक्यासह जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील साखर कारखान्यांनी ऊस तोड मजूर व ऊस तोडणी यंत्राव्दारे ऊसतोड सुरु केली आहे.

तालुक्यातील रावतळे कुरुडगाव येथे ज्ञानेश्वर गंगाधर भराट यांच्या दोन एकर ऊसाच्या क्षेत्रामध्ये पियुश प्रा.ली. वाळकी (ता. नगर) या साखर कारखान्यासाठी हे ऊस तोडणी यंत्र ऊस तोड करीत होते.

मात्र १० गुंठे ऊस तोड केल्यानंतर या मशीनमध्ये अचानक आग लागली. परिसरात पाण्याची कुठलीच सोय नसल्याने या आगीत हे मशीन पूर्ण जळून खाक झाले.

मशीनला लागलेल्या आगीमुळे ज्ञानेश्वर भराट यांचा ऊसही जळून खाक झाला. अकोला (ता. पाथर्डी) येथील हनुमंत बाबुराव बारगजे यांनी पाच महिन्यापूर्वीच कर्ज काढून हे मशीन खरेदी केले होते.

मशीनमध्ये अचानक आग लागल्याने ते जळून खाक झाल्याने ७५ लाख रुपयांचे नुकसान होवून आर्थिक फटका बसला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24