अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. यातच दुसऱ्या लाटेमुळे प्रशासनाची मोठी धावपळ होऊ लागली आहे.
सर्व तालुकापातळीवरील प्रशासन व्यवस्था कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे. यामुळे या परिस्थितीचा फायदा घेत शेवाग्व तालुक्यात वाळू तस्कर सध्या जोमात
आपला व्यवसाय करत आहे. वाळू तस्करांकडून तालुक्यातील विविध नदी पात्रांमधुन वाळु उपसा सर्रास सुरू असून
त्यामुळे नदी काठच्या भुगर्भातील पाणी पातळी खालवली आहे. सध्या कारवाई थंडावल्याने बेकायदा वाळू व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने या नद्यांसह ओढ्या नाल्यांनी त्या परिसरातील शेती व गावांना हिरवी समृध्दी आणली.
मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहुन आलेल्या वाळूवर आता तस्करांची नजर पडली आहे. या नद्या व ओढ्यांमधून रात्री वाळू उपशाचा हा खेळ चालु आहे.
गोदावरीच्या नावाखाली तालुक्यातील इतर नद्यांची वाळू ही धुवून चढ्या भावात ग्राहकांच्या विकली जाते. वर्षभर अशा गौण खनिजाचा अवैध उपसा सुरु राहिल्याने त्यातून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.