कोरोनामुळे शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा या दिवशी पार पडणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- कोरोनामुळे सर्व गोष्टी शासनाच्या नियमांच्या आधीं राहूनच पार पाडाव्या लागत आहे.

त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लग्न समारंभामध्ये देखील या नियमांबाबत अधिक कठोरता केली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट शिर्डी यांच्यावतीने अवघ्या सव्वा रुपयात होणारा यंदाचा 19 वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करोना नियमावलीचे पालन करत गर्दी न करता आणि वधु-वरांचे आई-वडील,

मामा यांच्या उपस्थीतीत येत्या 13, 14 व 22 मे 2021 या तीन दिवशी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती या सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे संयोजक शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी दिली.

साईबाबांच्या शिर्डीच्या भुमीतून सर्वधर्मीय विवाह सोहळ्याच्या मुहूर्तमेढ 2000 साली प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते यांनी रोवली.

गेल्या 20 वर्षांत सुमारे 1850 हुन अधिक जोडप्यांना विवाहबध्द करून कन्यादान करण्याचे पवित्र काम कोते दाम्पत्यांनी केले आहे.

शिर्डीतील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनानंतर संपुर्ण राज्यात विविध सामाजीक संघटनांनी शिर्डीच्या धर्तीवर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून ही चळवळ यशस्वी केली आहे.

करोनाच्या काळात गेल्या वर्षी लॉकडॉउनमुळे शिर्डीतील सर्वधर्मीय विवाह सोहळा स्थगित करण्यात आला होता. दरम्यान यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा येत्या 13, 14 व 22 मे 2021 या तीन दिवशी आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक 13 मे रोजी सकाळी 10 वाजता साईप्रसाद अपार्टमेंटच्या प्रांगणात 10 जोडप्यांचा, 14 मे रोजी सकाळी 10 वाजता 10 जोडपे आणि 22 मे रोजी 10 जोडप्यांचा विवाह करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24