अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने नव्या पिढीत राजमाता जिजाऊंच्या शिकवणीप्रमाणे शिवाजी महाराजांसारखे संस्कार घडविण्यासाठी जिजाऊ शिव जाणिव जागरण कार्यक्रम जारी करण्यात आला.
तर भूमीगुंठा योजनेतंर्गत स्मॉल इंडस्ट्री फ्रॉम होम योजनेचा प्रस्ताव हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित मांडण्यात आला.
प्रारंभी दिवंगत न्यायमुर्ती पी.बी. सावंत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, पोपट भोसले, कारभारी वाजे, बळीराम पाटोळे, नंदाबाई साबळे, दत्तात्रय वाजे, किशोर शेरकर, नाना चौरे, फरिदा शेख, पद्मा झेंडे, शोभा चोभे, अंबिका जाधव आदी उपस्थित होते. आत्मनिर्भर भूमी गुंठा योजनेअंतर्गत स्मॉल इंडस्ट्री फ्रॉम होम अशी योजनेचा प्रस्ताव संघटनेच्या वतीने मांडण्यात आला.
तर या संघटनांनी आज जारी केली आत्मनिर्भर घरकुल आणि आत्मनिर्भर रोजगार यासाठी नगर एमआयडीसी शेजारी असलेल्या निंबळक येथील सर्वे नंबर 54 मध्ये घरकुलांसाठी 80 हजारात रुपयात एक गुंठा तसेच घराशेजारी स्मॉल इंडस्ट्री उभी करण्यासाठी दुसरा भूमी गुंठा देखील 80 हजार रुपयात उपलब्ध करुन देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
एकाच ठिकाणी राहण्यासाठी निवारा आणि त्याच ठिकाणी रोजगार अशा दोन्ही प्रश्न मार्गी लावून घरकुल वंचित सक्षम होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
नवीन पिढी शिवाजी महाराजांच्या विचाराने व संस्काराने मार्गक्रमण करीत नसल्याने अनेक प्रश्नात अडकली आहे. नव्या पिढीत शिवाजी महाराजांसारखे संस्कार रुजविण्यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराजांवरील लिहिलेल्या ऐतिहासिक पुस्तकावर आधारित जिजाऊ शिव जाणीव जागरण कार्यक्रम जारी करण्यात आला. शाहीर व लोककलाकारांच्या माध्यमातून जिजाऊ शिव जाणीव जागरण कार्यक्रम कार्यान्वीत केला जाणार आहे.
अॅड. कारभारी गवळी म्हणाले की, रेशनकार्डवर घरकुल देण्याची सत्ताधारी भाजप सरकारची कुवत नाही. देशातील सुशिक्षित बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नाही. घरकुल वंचितांना स्मॉल इंडस्ट्रीच्या माध्यमातून रोजगार चालणा देण्याच प्रयत्न आहे.
तर नवीन पिढी सुसंस्कारीत घडण्यासाठी जिजाऊ शिव जाणिव जागरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांसारखा आदर्श राज्यकर्ता आणि शासक आजपर्यंत झाला नाही. शिवाजी महाराजांचा विसर पडल्यामुळेच स्वतंत्र्योत्तर काळात भ्रष्टाचार, अत्याचार, अनागोंदी माजली असल्याचे त्यांनी सांगितले.