लॉकडाउनमुळे अनेकांवर आलीय ही’ वेळ!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-गतवर्षीच्या मार्च महिन्यामधील लॉकडाऊनमध्ये हातातील काम गमावून घरी बसलेल्या मजुरांना दुर्बल घटकांना व टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना अनेकांनी पुढे होत मदत केली होती.

मात्र या वर्षी तशी परिस्थिती दिसत नाही, मदतकार्याचा ओघ थांबल्याने दिवसभर मजुरी करून पोट भरणाऱ्यांवर लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली असून, मोठ्या प्रमाणात बेरोजगारीत वाढ झाली आहे.

अनेक औद्योगीक वसाहतींमधील मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.कोरोनाच्या भितीपेक्षा लॉकडाऊनच्या भीतीने उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने, मजुरांच्या हातचा रोजगार गेला आहे.

बांधकाम व्यवसाय सततच्या लॉकडाऊनमुळे डबघाईला आला असल्याने बांधकाम मजुरांच्या कुटुंबांची अवस्था बिकट बनली आहे. रानमेवा विकून पोट भरणाऱ्या आदिवासींच्या कुटुंबाची स्थिती देखील फारशी वेगळी नाही.

मदतीसाठी कोणापुढे हात पसरायचे ? असा प्रश्न त्यांना पडु लागला आहे. मदतीची याचना करणाऱ्या असंख्य कुटुंबावर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढावली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24