अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- सर्वसामान्य जनतेला रेशन कार्डवर वाटपासाठी आलेला रेशनचा काही माल छुप्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने टेम्पोत घेऊन जात असताना काही तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला.
याबाबत आधीक माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील एका स्वस्त धान्य दुकानात मोफतचा रेशनचा माल हा आला होता. तो माल स्वस्त धान्य दुकानदाराने गहू व तांदूळ हा माल कार्डधारकांना वाटल्यानंतर त्यामधील शिल्लक राहिलेला काही माल हा शनिवार दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास
एका टेम्पोमध्ये काही मोकळे बारदानासह तांदळाचे २४ कट्टे व ३ तांदळाचे कट्टे त्यामध्ये टाकण्यात आले होते. हा प्रकार काही सतर्क तरुणांच्या लक्षात आले.
त्यांनी टेम्पोमध्ये बारदानासह काही तांदळाचे कट्टे टाकताना रंगेहात पाहिल्यानंतर तरुणांनी तो टेम्पो अडवून त्यातील माल खाली उतरून घेतला आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले तसेच काही ग्रामस्थांनी शेवगावच्या तहसीलदार यांना सदरील घटनेची सविस्तर माहिती फोन द्वारे कळविल्यानंतर याची तत्काळ दखल घेऊन
शेवगावच्या तहसीलदार अर्चनाताई पागिरे यांनी काही कर्मचारी घटनास्थळी पाठविण्यात आले तसेच तहसीलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेची पाहणी केली
तसेच पंचनामा करून २४ कट्टे तांदूळ व ३ कट्टे तांदूळ असा रेशनचा माल पुढील आदेश होई पर्यंत सदरील माल वाटप करू नये तसेच हलवू नये अशी लेखी समज देण्यात आली आहे.