या कारणामुळे नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भरत असलेले भंडारदरा धरण तब्बल २७ दिवस उशिराने भरले. शनिवारी सायंकाळी धरणाचा पाणीसाठा १०५५९ द.ल.घ.फू होऊन धरण ९५.६५ टक्के भरले आहे. तर सुरु असलेल्या पाण्याची फ्लोनुसार धरण १२ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण क्षमतेने भरले आहे.

यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. यंदा पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने जिल्हयात सुरुवातीला चिंतेचे वातावरण होते. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला. अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात पाऊसाचा जोर ओसरल्याने दरवर्षी भंडारदरा धरण १५ ऑगस्टला तुडूंब भरण्याचे परंपरेत यंदा खंड पडला होता.

यामुळे सर्वांची चिंता वाढली गेल्या चार-पाच दिवसांत पुन्हा जोरदार पाऊसाला सुरुवात झाल्याने १२ सप्टेंबर २०२१ रोजी भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तब्बल २७ दिवस उशिराने धरण भरले आहे. निळवंडे धरण ८२ टक्के भरले आहे. शनिवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ५५९ द.ल.घ.फु.झाला होता.

तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा ६ हजार ७७८ द.ल.घ.फु झाला होता. भंडारदरा धरणात रोज ३९० द.ल.घ.फु नवीन पाण्याची आवक होत आहे. शनिवारी दिवसभरात पाणलोट क्षेत्रातील घाटघर – ८१मि.मी. रतनवाडी – १२७ मि.मी, पांजरे – ६९.मि.मी, वाकी – ५१ मि.मी,

भंडारदरा(धरण) – ७० मि.मी.,निळवंडे(धरण) – १८ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे तर १ जुन २०२१ पासून आत्तापर्यंत सर्वाधिक घाटघर ३३३५ मि.मी.,रतनवाडी ३२३६ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे तर आढळा विभागात पावसाचे प्रमाण कमी असुन आढळा धरण परिसरात केवळ २५८ मि.मी.पाऊस झाला आहे.