अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-अनेक ठिकाणांवरून स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट धान्य मिळत असल्याच्या तक्रारी इतर जिल्ह्यांत प्राप्त होत आहेत.
याच पार्श्ववभूमीवर श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका स्वस्त धान्य दुकानाची आमदार लहू कानडे यांनी गाडी थांबवून अचानक तपासणी केली. तेथे ग्राहकांना मिळणाऱ्या धान्याच्या दर्जाची पाहणी केली.
कोरोना संकटात प्रशासनाने लाभार्थ्यांशी संवाद साधावा. नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी. वेळप्रसंगी दुकानदारांना विचारणा करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशी विनंतीही यावेळी उपस्थितांनी कानडे यांनी केली. दरम्यान कोरोना संकट आणि त्यातच राज्यात सुरु असला लॉकडाऊन यामुळे नागरिकांना मे महिन्यात स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार लहू कानडे यांनी स्वस्त धान्य दुकानदारांचे रजिस्टर अद्ययावत आहे की नाही, याची पाहणी केली. शिधापत्रिकाधारकांशी बोलून धान्याच्या दर्जाची चौकशी केली. प्रत्यक्षात धान्याचा साठा पाहून खात्रीही केली.
तपासणीनंतर पुरवठा विभागाला माहिती देत दुकानांची समित्यांमार्फत अथवा कार्यालयीन कर्मचारी पाठवून नियमित तपासणी सुरू ठेवण्याचे आदेश कानडे यांनी दिले.