कोरोनाकाळात ‘या’ राज्याने कर्मचाऱ्यांना दिली 30 टक्के पगारवाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-तेलंगणा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि लाभदायक माहिती समोर आली आहे.

एकीकडे देश कोरोनाच्या संकटात लढत आहे, यामुळे राज्य आर्थिक संकटात देखील आले आहे, मात्र तेलंगणामध्ये मुख्यमंत्र्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना एक खुशखबर देऊन टाकली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून 30 टक्के पगारवाढ मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा फायदा तेलगणातील तब्बल 9 लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोमवारी सकाळी विधानसभेत ही घोषणा केली आहे.

मागील वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळं सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ शक्य झाली नाही. राज्य सरकारचीही आर्थिक स्थिती खालावल्यामुळे या निर्णयाला अजून वेळ लागला.

आता परिस्थिती काहीशी सुधारल्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे.

निवृत्तीचं वय 60 वर्षे :- तामिळनाडू सरकारने शिक्षक, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांसह आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे केलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 1 वर्षाने वाढ करुन, ते 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली आहे.

सेल. त्यांच्या ईव्ही खरेदीच्या निर्णयामुळे पर्यावरणाला कशी मदत झाली हे त्यात सांगितले जाईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24