अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील पानेगाव ते शिरेगाव रस्त्यादरम्यान असलेल्या पानेगावमध्ये भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली आहे.

शिवाजी राजाराम जंगले यांचे वस्तीवर आज भर दुपारी दरोडा टाकत सुमारे रोख रक्कम पंधरा हजारांसह आठ तोळे सोन्यासह चोरट्यांनी पोबारा केला.

आतापर्यंत रात्रीच्या चोऱ्या होत होत्या परंतु दिवसा देखील घरकुणी नसल्याचा फायदा घेत चोरटे आता आपला हात साफ करुन घेऊ लागल्याने भितीचे वातावरण पसरत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरफोड्या, वाहनचोरी, फसवणूक आणि दरोड्यांच्या घटनांचा आलेख चढतच आहे.

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असताना नेवासा तालुका देखील यामध्ये मागे राहिलेलं नाही आहे. गेल्या काही महिन्यापासून नेवासा तालुक्यात घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24