लॉकडाऊनच्या काळात ‘या’ तालुक्यात अवैध धंदे सुसाट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे.

मात्र तरीही अनेक ठिकाणी नियमांना डावलून अवैध धंदे सुरूच ठेवण्यात आले आहे. नुकताच असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडताना दिसून येत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र अवैध व्यवसायाला या काळात तेजी आली आहे.

राज्य शासनाचे लॉकडाऊन व श्रीगोंदा तालुक्यातील दहा दिवसाच्या जनता कर्फ्यूमुळे दवाखाने व मेडिकल या सेवा वगळता जवळपास सर्व व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

असे असताना जुगार, मटका व दारू हे अवैध व्यवसाय मात्र चोरीछुपे जोरात सुरू आहेत. विसापूर येथे तर सर्व अवैध धंदे सरकारी जागेवर सुरू आहेत.

काही लोक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर टपऱ्यांमध्ये, काही लोक रेल्वेच्या मोकळ्या जागेत, तर काही शासनाच्याच इतर जागेवर जुगार, मटका व दारूचे अड्डे टाकून बसले आहेत.

अवैध धंद्यांमुळे तालुक्यात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे अशा अवैध व्यवसायीकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24