Gold Price Update : सोने आणि चांदीच्या किमतीत सतत दरवाढ किंवा घसरण सुरु असते. सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीचा दर हा जास्त असतो. देशात सध्या लग्नसराईचा मोसम सुरु आहे.
असे असतानाही सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण झालेली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या मोसमात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या नवीनतम दर.
मागील आठवड्यात सोने स्वस्त झाले होते. अशातच आता चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सोने 293 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त तर चांदी 509 रुपयांनी महाग झाली होती. सध्या सोन्याचा दर 3540 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 18151 रुपये प्रति किलोने स्वस्त झाला आहे.
एकीकडे गेल्या व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 52660 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 61829 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर दुसरीकडे, मागील व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 नोव्हेंबर 2022 रोजी सोने 52953 रुपये आणि चांदी 61320 रुपयांवर बंद झाली.
आज नवीन दर जाहीर होणार
आज नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू होणार आहे. जर शेवटच्या व्यापार सप्ताहाचा विचार करायचा झाला तर सराफा बाजारात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही नरमाई दिसून आली. आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
शुक्रवारी हे दर होते
मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने 53 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले होते आणि ते 52660 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 295 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले तर 52713 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते.
त्याचबरोबर शुक्रवारी सोने आणि चांदीचे दर कमी झाले होते. त्यामुले चांदी 437 रुपयांनी घसरून 61829 रुपये प्रति किलोवर बंद झाली. त्याचबरपबर गुरुवारी चांदीचा दर प्रति किलो ५६६ रुपयांच्या वाढीसह ६२२६६ रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता.
14 ते 24 कॅरेट सोन्याचे भाव
शुक्रवारी 24 कॅरेट सोने 53 रुपयांनी स्वस्त होऊन 52660 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 53 रुपयांनी स्वस्त होऊन 52449 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 48 रुपयांनी स्वस्त होऊन 48237 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 48 रुपयांनी स्वस्त झाले होते. 40 ते 39495 रुपये आणि 14 कॅरेट सोने 53 रुपयांनी स्वस्त झाले. सोने 31 रुपयांनी स्वस्त होऊन 30806 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
सोने 3500 रुपयांनी तर चांदी 18100 रुपयांनी स्वस्त
सोने 3540 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात असून सोन्याने ऑगस्ट 2020 मध्ये उच्चांक गाठला होता. तेव्हा सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर होता. तर दुसरीकडे, चांदी 18151 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.
मिस्ड कॉल देऊनही जाणून घेऊ शकता सोन्याची नवीनतम किंमत
तुम्ही आता 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. त्याचबरोबर तुम्ही अपडेट्ससाठी http://www.ibja.co किंवा http://ibjarates.com ला भेट देऊ शकता.
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता पहा
सरकारने आता सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवले आहे. ग्राहक आता बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करता येते.