प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक; केडगावकर भरवतायत भाजीपाला बाजार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात कठोर नियम लागू करण्यात आले आहे. यातच नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

मात्र तरीही लोकांचा बेजबाबदारपणा कायमचा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा एकदा आपण कोरोनाला आमंत्रण देत आहोत अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे.

नुकतेच केडगाव परिसरातील भाजीबाजार भरवण्यास महापालिकेने मनाई घातली असतानाही भूषणनगर, नगर – पुणे रोड येथे प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत व्यापारी, विक्रेते बाजार भरवत आहे. तेथे खरेदीसाठी गर्दी होत आहे.

यामुळे या ठीकाणी भरवणारा बाजार हा कोरोनाला निमंत्रण देत आहे. मनपाने सर्वच भाजीपाला बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

घरोघरी जाऊन भाजीपाला विकण्यास परवानगी दिली असताना भूषणनगर लिंकरोड येथे दररोज सकाळी पंचवीस ते तीस भाजीविक्रेते ठाण मांडून बसत आहेत. मनपाचे भरारी पथक मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. भाजी खरेदी करताना नागरिक गर्दी करतात.

अशावेळी सर्व नियम पायदळी तुडविली जात आहेत.या परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तरी ही येथील नागरिकांना याचे गांभीर्य दिसून येत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24