अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकाने दोन अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त करून सुमारे १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी खैरी निमगाव परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा केला आहे.
यावेळी रमेश धोंडीराम गायकवाड (वय-३५ रा. खैरी निमगाव) याच्याकडून ४२ हजार रुपये किंमतीची 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन,
१५०० रुपये किंमतीची १५ लिटर गावठी दारू व अर्जुन केशव गायकवाड याच्याकडून ५६,००० किंमतीचे ८०० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व २५०० रुपये किमतीची २५ लिटर तयार गावठी हातभट्टी असा एकूण १ लाख २ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दोघांविरुद्ध आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे,
मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अचानक व श्रीरामपूरसह राहुरी तालुक्यात लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे खैरी निमगाव परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईबद्दल खैरी निमगाव येथील महिलांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहे. सदरची कारवाई श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक,
अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, पो. कॉ. रवींद्र लगड, आर सी पी पथक आदींनी केली आहे.