अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या तर काहीचे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत आपण एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.
भारतीय रेल्वे प्रशासनाने व्यवसायाची एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. तुम्ही कमी भांडवलात सुद्धा बम्पर नफ्यासह व्यवसाय सुरू करू शकता. दरम्यान, आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत भारतीय रेल्वेने सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आपला भागीदार होण्याची संधी दिली आहे. तुम्ही रेल्वेला उत्पादने विकून कमावू शकता.
रेल्वेला प्रोडक्ट विकून करा ;- कमाई रेल्वेकडून दरवर्षी 70,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची प्रोडक्ट्स खरेदी केली जातात. यामध्ये टेक्निकल आणि इंजिनिअरिंग प्रोडक्ट्ससह रोजच्या वापरासाठी लागणारे विविध प्रोडक्ट्सचा समावेश आहे.
व्यवसायासाठी करू शकता :- रजिस्ट्रेशन जर तुम्ही रेल्वेसोबत व्यवसाय करु इच्छित असल्यास https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करु शकता.
व्यवसायाची संधी कशी मिळवा? :- मेक इन इंडिया धोरणांतर्गत, केवळ 50 टक्क्यांहून अधिक स्थानिक उत्पादने असलेले पुरवठादार रेल्वे वॅगन, ट्रॅक आणि एलएचबी कोचच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. त्याचवेळी, ‘वंदे भारत’ ट्रेन संचासाठी 75 टक्के इलेक्ट्रिक वस्तू मेक इन इंडिया अंतर्गत खरेदी केल्या जातील. बाजारात सर्वात स्वस्त वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून रेल्वे कोणतेही उत्पादन खरेदी करते. अशा परिस्थितीत, तुम्हाला असे उत्पादन शोधावे लागेल जे तुम्हाला कोणत्याही कंपनी किंवा बाजारातून सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळेल. तुमच्या खर्च आणि नफ्याच्या आधारावर निविदा दाखल करता येईल. तुमचे दर स्पर्धात्मक असले पाहिजेत तरच तुम्हाला निविदा मिळवणे सोपे होईल.
काय सूट मिळणार? :- रेल्वे लहान उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योगांना रेल्वेच्या कोणत्याही टेंडरच्या खर्चाच्या 25 टक्के खरेदीमध्ये 15 टक्के पर्यंत प्राधान्य मिळते. याशिवाय, लघू उद्योगांसाठी ईएमडी आणि सिक्युरिटी डिपॉझिट जमा करण्याच्या अटी शिथिल केल्या आहेत.
दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही :- तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केली असेल किंवा तुम्ही रेल्वेच्या दुसर्या एजन्सीमध्ये प्रोडक्ट्स पुरवण्यासाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्ही रेल्वेसोबत व्यवसाय सुरू करू शकता.