ताज्या बातम्या

Post Office Scheme : एकदाच पैसे गुंतवून महिन्याला कमवा हजारो रुपये, जाणून घ्या डिटेल्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Post Office Scheme : सध्या पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. कोट्यवधी लोक या योजनांचा लाभ घेत आहे. कारण पोस्ट ऑफिसच्या योजनेत कोणतीच जोखीम नसते त्याशिवाय परतावाही जबरदस्त असतो.

पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त एकदाच पैसे गुंतवून घरबसल्या महिन्याला हजारो रुपये कमावू शकता. काय आहे पोस्ट ऑफिसची ही योजना जाणून घेऊयात.

पोस्ट ऑफिसची ही योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना आहे. ही पोस्ट ऑफिसची सुरक्षित गुंतवणूक योजना असून त्यात पैसे जमा करून महिनाभरात जास्त पैसे कमावता येतात. या योजनेत तुम्ही फक्त 1000 रुपये जमा करून खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी तुम्ही कोणत्याही जवळच्या बँकेच्या शाखेला किंवा पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत भेट द्या.

महिन्याला होईल बक्कळ कमाई

या खात्यात तुम्ही एकरकमी 4.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला वार्षिक 29,700 रुपये मिळतील. याचा अर्थ असा की तुम्हाला दर महिन्याला 2475 रुपये मिळतील. परंतु, त्यापूर्वी हे लक्षात ठेवा की ही रक्कम 5 वर्षांच्या मुदतपूर्तीनंतर उपलब्ध होणार आहे. वार्षिक 6.6 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. तुम्ही याच योजनेअंतर्गत संयुक्त खातेही उघडून लाभ घेऊ शकता.

असतात या अटी

वयाची 18 व्या वर्षानंतर तुम्ही या योजनेत खाते उघडू शकता. या योजनेत मॅच्युरिटीवर व्याजासह मोठी रक्कम मिळते. जर तुम्ही 1 वर्षानंतरच पैसे काढले तर तुम्हाला ही रक्कम मिळत नाही. तसेच तुम्ही पैसे 5 वर्षांच्या मध्यात काढले, तर तुम्हाला एकूण जमा केलेल्या मूळ रकमेपैकी 1% वजा करून पैसे परत मिळतील. म्हणजे तुम्हाला तोटा सहन करावा लागेल.

गरजेची आहे ही कागदपत्रे

या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असल्यास तुमच्याकडे पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे गरजेची आहे.

Ahmednagarlive24 Office